शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Bihar Assembly Election Results: ...म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारण

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 16:09 IST

Bihar Assembly Election Results: संजय राऊत यांच्याकडून तेजस्वी यादवांचं तोंडभरुन कौतुक

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष राज्यातला क्रमांक एकचा पक्ष होण्याकडे वाटचाल करत आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मोठा फटका बसला आहे. जेडीयूला सध्या ५० पेक्षा कमी जागांवर आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत जेडीयूनं ७१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. भाजपनं जास्त जागा जिंकल्यानं मुख्यमंत्रिपद कोणाला याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदानभाजपला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलं. बिहारचा विनाअडथळा विकास व्हावा यासाठी नितीश यांचं सरकार आणा, असं आवाहन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला केलं. आताही भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी तशीच भूमिका मांडली आहे. यावर शिवसेनेने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?शब्द पाळला नाही, तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलेला आहे. त्यामुळेच आता बिहारमध्ये भाजपनं सावध भूमिका घेतल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 'भाजपनं शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. जागा कमी जास्त आल्या तरीही मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे शिवसेनेनं पलटवार केला. त्यामुळेच आता भाजप आपल्या मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळत आहे. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत,' असं राऊत म्हणाले.भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?सध्याच्या कलांमध्ये बिहारमध्ये एनडीए पुढे असली तरीही आपण निकालांची वाट पाहायला हवी, असं राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राजदचे नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक केलं. तेजस्वी यादवांच्या रुपानं बिहारला एक नवा चेहरा मिळाला आहे. तेजस्वी यादव यांनी एनडीएला दिलेली लढत पाहता तेच मॅन ऑफ द मॅच आहेत. ३० वर्षांचे तेजस्वी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमारांविरोधात एकटे लढले, अशी स्तुतीसुमनं राऊत यांनी उधळली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा