शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results: २, १२ अन् १६... बिहारमध्ये टफ फाईट; ३० जागांमुळे वातावरण टाईट

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 19:33 IST

Bihar Assembly Election Results: निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या २९ जागांकडे सर्वांचं लक्ष

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार हे अद्यापही स्पष्ट होताना दिसत नाही. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच सुसाट सुटलेल्या महागठबंधनची नंतर पिछेहाट सुरू झाली. आधी क्रमांक एकवर दिसत असलेला राष्ट्रीय जनता दल नंतर मागे मागे येऊ लागला. मग भारतीय जनता पक्षानं जोरदार मुसंडी मारली. आता पुन्हा एकदा राजदनं भाजपला मागे टाकलं आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे.फासा पलटला! भाजपाला राजदने टाकले मागे; 14 जागांचाच निकाल हातीसध्याच्या घडीला २४३ जागांपैकी ३१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पैकी १० जागा भाजपनं खिशात घातल्या आहेत. तर राजदनं ८ ठिकाणी विजय मिळवला आहे. जेडीयूनं ६, तर काँग्रेसनं २ जागा मिळवल्या आहेत. जिंकलेल्या जागा आणि सध्याची आघाडी विचारात घेतल्यास भाजपला ७२ जागा मिळू शकतात. तर राजदला ७६, जेडीयूला ४१, तर काँग्रेसला २० जागांवर यश मिळू शकतं. सध्या एनडीए १२०, तर महागठबंधन ११५ जागांवर पुढे आहेत. बिहारच्या विधानसभेत जादुई आकडा १२२ आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रचंड मोठी चुरस पाहायला मिळत आहे.बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...कोरोना संकटामुळे मतमोजणी करताना निवडणूक आयोगाला अडचणी येत आहेत. एका मतमोजणी केंद्रावर कर्मचारी काही अंतरावर बसले असल्यानं निकाल लागण्यास उशीर होत आहे. त्यातच २९ जागांवर एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर आहे. यातल्या २ मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन उमेदवारांमधील मतांचं अंतर १०० पेक्षाही कमी आहे. राज्यातल्या १२ मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन उमेदवारांमधील मताधिक्य ५०० हून कमी असल्याचं जोरदार चुरस आहे. तर १६ मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन उमेदवारांना आतापर्यंत मिळालेल्या मतांमध्ये १००० पेक्षा कमी अंतर आहे. त्यामुळे या ३० मतदारसंघांचे निकाल थेट राज्याच्या निकालांवर परिणाम करू शकतात. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल