शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Bihar Assembly Election Results: "राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते बुडाले"

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 14:31 IST

Bihar Assembly Election Results: भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून टोला

पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर सकाळी सुसाट सुटलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची आता पिछेहाट होताना पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सध्याचे आकडे सांगत आहेत. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे.मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजद आणि काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली होती. त्यावेळचे कल पाहता राज्यात सत्तातंर होईल असं दिसत होतं. मात्र त्यानंतर भाजप आणि जेडीयूनं आघाडी घेतली. सध्याच्या घडीला एनडीए १३० जागांवर पुढे आहे. तर महागठबंधननं शंभरी गाठली आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी महागठबंधनला टोला लगावला आहे. भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?'राहुल यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत. डाव्यासोबत पश्चिम बंगाल मध्ये गेले डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हरले. तेजस्वी यादव यांच्यासोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव', असा टोला उपाध्येंनी लगावला आहे.बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे सध्याच्या घडीला बिहारमध्ये एनडीएनं आघाडी घेतली आहे. एनडीए १२७ जागांवर पुढे आहे. भाजपचे ७३ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर जेडीयू ४७ विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. राष्ट्रीय जनता दलानं ६८, तर काँग्रेसनं १९ जागांवर आघाडी घेतली आहे. राजद, काँग्रेस आणि जेडीयूच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी होताना दिसत आहेत. याचा थेट फायदा भाजपला झाला आहे. भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवMamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी