शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेसाठी अखेर एनडीएचे जागावाटप ठरले, नितीश कुमारांनी केली अधिकृत घोषणा

By बाळकृष्ण परब | Published: October 06, 2020 6:09 PM

Bihar Assembly Election 2020: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईलभाजपा आपल्या वाट्याला आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसासाठी बऱ्याच खेचाखेचीनंतर अखेर सत्ताधारी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. तर काही दिवसांपर्यंत एनडीएचा घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.या घोषणेनुसार बिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा आल्या आहेत. त्यापैकी जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल, तर जेडीयू ११५ जागांवर निवडणूक लढवेल. भाजपा आपल्या वाट्याला आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल.

यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी सांगितले की, नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढवणार आहे आणि विजयी होऊन सरकार बनवणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका घेण्याची गरज नाही. यापूर्वी सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी बिहार कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्य प्रभारी भूपेंद्र सिंह यादव उपस्थित होते.  २८ ऑक्टोबरपासून तीन टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएचा सामना महाआघाडीशी होणार आहे. महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय आणि सीपीएम या पक्षांचा समावेश आहे. तर एनडीएचा घटकपक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे १४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र लोकजनशक्ती पक्ष भाजपाविरोधात उमेदवार उतरवणार नाही.यापूर्वी भाजपा आणि जेडीयूने २०१० मध्ये विधानसभा निवडणूक एकत्रितरीत्या लढवली होती. त्यावेळी जेडीयूने १४१ आणि भाजपाने १०२ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी जेडीयूचे ११५ आणि भाजपाचे ९१ उमेदवार विजयी झाले होते.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा