Bihar Assembly Election 2020: नितीश कुमारांचा (नंबर)'गेम' होणार?; लोजपनं दंड थोपटले, भाजपला फायदा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:33 AM2020-10-06T02:33:44+5:302020-10-06T06:43:40+5:30

जनता दल(यु)ला विरोध; भाजपची प्रशंसा करून लाभाची आशा; बिहारमध्ये लोजपने दिले दोन महत्त्वाचे संकेत

Bihar Assembly Election 2020 LJP to contest against all JDU candidates but gives support to BJP | Bihar Assembly Election 2020: नितीश कुमारांचा (नंबर)'गेम' होणार?; लोजपनं दंड थोपटले, भाजपला फायदा होण्याची शक्यता

Bihar Assembly Election 2020: नितीश कुमारांचा (नंबर)'गेम' होणार?; लोजपनं दंड थोपटले, भाजपला फायदा होण्याची शक्यता

Next

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका, राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रशंसा करून लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) राज्यात विधानसभा निवडणुकीत दोन महत्त्वाचे संकेत दिले.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या विरोधात वातावरण असल्याचा वास लोजपला आला असून, भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळण्याच्या उद्देशाने तो मदतही करत आहे. लोजप रालोआतून बाहेर पडला, याला जनता दल (यु) आणि भाजपने फार महत्त्व दिले नाही; परंतु घटनाक्रम पाहिल्यास जनता दलाच्या (यु) काही जागा खेचण्यासाठी लोजप जो प्रचार करत आहे, त्याकडे भाजप लाभाच्या नजरेतून बघत आहे. नितीशकुमार यांना लक्ष्य करण्यासाठी विरोधी पक्षांना यातून दारूगोळाही मिळणार आहे. लोजपने त्याला हव्या तेवढ्या जागा भाजपने न दिल्याबद्दल टीकाही केली होती. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोजपने २४३ जागांपैकी फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी होती ४.८३ टक्के. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोजपने लढवलेल्या सहाही जागा जिंकल्या होत्या. त्यात मोदी फॅक्टर कामाला आला होता. विधानसभा निवडणुकीत लोजप १४३ जागा लढवणार आहे.

Web Title: Bihar Assembly Election 2020 LJP to contest against all JDU candidates but gives support to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.