शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 18:42 IST

Maharashtra Politics News: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे.

ठळक मुद्देशिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेटसंजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेटया संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या कुरबुरी, तसेच सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणांकडून राज्यातील सत्ताधारी पक्षामधील अनेक नेत्यांवर टाकण्यात येत असलेले चौकशांचे जाळे यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थिरतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (Sanjay Raut) राज्यात सत्तांतर होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. (Ashish Shelar) त्याचदरम्यान, आता राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. (Secret meeting between Sanjay Raut and Ashish Shelar, discussion in political circles)

शिवसेनेने भाजपाशी असलेली युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची केलेल्या स्थापनेदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि सामनामधील अग्रलेखांमधून तसेच पत्रकार परिषदेमधून बोचरी टीका करत भाजपाला जेरीस आणणारे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे. टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यात होणार आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे कधीही पडणार असल्याचे दावे भाजपाच्या नेत्यांकडून केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे.  संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.

दरम्यान, या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही भेट राजकीय नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असा दावा त्यांनी केला आहे. या भेटीत काही राजकीय संदर्भ आहेत का याबाबत पक्षीय पातळीवर माझ्याकडे काही माहिती नाही,असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAshish Shelarआशीष शेलारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी