शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...
3
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
4
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
5
विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण
6
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
7
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
8
"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
9
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
10
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
11
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
12
जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
13
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
14
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
15
Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर
16
तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?
17
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
18
मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!
19
जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?
20
सैफ-करिनाच्या रिसेप्शन पार्टीत 'पंचायत' फेम हा अभिनेता होता वेटर, 'मिर्झापूर'मध्येही केलंय काम

मोठी बातमी: अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, विचारपूस करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 9:30 AM

Narayan Rane was called by Amit Shah: एकीकडे नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे भाजपाची ठामपणे नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे.

मुंबई - मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे भाजपाची ठामपणे नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे. दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनंतर आता केंद्रीय पातळीवरूनही नारायण राणेंना पाठिंबा मिळत आहे. अटकेच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही नारायण राणेंना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. (After the arrest, Narayan Rane was called by Amit Shah)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या विधानाशी सहमती दर्शवली नसली तरी भाजपा राणेंच्या पाठीशी उभा राहील, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नाराणय राणेंच्या मागे पक्ष उभा राहील असे सांगितले होते. तसेच नारायण राणेंवरील कारवाईविरोधात भाजपानेही तीव्र आंदोलने केली होती. आता अटकेच्या कारवाईमुळे थांबलेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.

जामिनावर सुटल्यानंतर काल नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी लक्षात ठेवा, तुम्ही माझे काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. दरवेळी तुम्हाला पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेला डिवचले. आपली जन आशीर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून सिंधुदुर्गपासून पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी अटक झाल्यानंतर महाड कोर्टाने मंगळवारी रात्री राणे यांना जामीन मंजूर केला होता.

नेमकं काय आहे प्रकरणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.  त्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले होते. अखेर रात्री उशिरा नारायण राणेंना जामीन मंजूर झाला होता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण