शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली; कमलनाथ तातडीने 10 जनपथवर सोनिया, प्रियांका गांधींच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 14:09 IST

Kamalnath may be next Congress working President: पुढील वर्षी उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तिकडे पंजाबमधील वाद देखील थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे पक्षाला अध्यक्ष असला तर एकसुत्रता येईल आणि नेत्यांमध्ये देखील विश्वासाचा मेसेज जाईल असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. 

ऐतिहासिक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद (Congress President) बऱ्याच काळापासून रिक्त आहे. यामुळे पक्षावर मोठी नामुष्की ओढविली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष पद सो़डले होते. तेव्हा पासून रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाला कार्य़कारी अध्यक्ष देण्यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या पदावर मध्य प्रदेशची सत्ता गमावलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. (Kamalnath may be next Congress working President; meeting started with Sonia Gandhi, Priyanka Gandhi.)

पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला; कॅप्टन मुख्यमंत्री, सिद्धूंना मिळणार त्याहून मोठे पद: हरीश रावत

या पार्श्वभूमीवर कमलनाथ हे 10 जनपथ येथे पोहोचले असून तिथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी उपस्थित आहेत. काँग्रेसला अध्यक्ष हवा, अशी चर्चा गेल्या काही काळापासून जोर धरू लागली आहे. यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनिष्ठ असलेले कमलनाथ असावेत असा विचार केला जात आहे. कमलनाथ यांनी ही जबाबदारी स्वीकारली तर तो एक मोठा बदल ठरणार आहे. 

सध्यातरी त्यांना कार्यकारी अध्यक्ष केले जाण्याची शक्यता असली तरी देखील सोनिया गांधी याद्वारे अनेक संकेत देत आहेत. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर पक्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तिकडे पंजाबमधील वाद देखील थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे पक्षाला अध्यक्ष असला तर एकसुत्रता येईल आणि नेत्यांमध्ये देखील विश्वासाचा मेसेज जाईल असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. 

पंजाबकाँग्रेसमध्ये (Punjab congress crisis) उठलेले राजकीय संकट शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हरीश रावत यांनी यावर मोठे संकेत दिले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) आणि कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) यांच्यामधील कलह दूर करण्याचा फॉर्म्युला शोधण्यात आला आहे. यानुसार कॅप्टन मुख्यमंत्री पदी कायम राहणार आहेत, तर नाराज सिद्धूंना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनविले जाणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी