शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

'मुंबईतील 'त्या' नऊ मजली इमारतीत भुजबळ कुटुंब राहतं, पण मालक दुसराच कुणीतरी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 3:10 PM

kirit somaiya Slams bhujbal family: 'मुंबईत एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, आणि भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?'

नाशिक: भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुंबईतील एका नऊ मजली इमारतीत भुजबळ कुटुंब राहत आहे. पण, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं', अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. 

नाशिक दौऱ्यावर आलेल्या किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपनी पाहणी केली. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर टीका केली. 'मुंबईतील सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. पण, ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. या बिल्डिंगशी आणि परवेज कन्स्ट्रक्शनशी तुमचा संबंध काय? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच, मुंबईत एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, आणि भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली? इमारतीमध्ये राहण्याचं भाडं तुम्ही भरता की, ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इमारत बांधली तर बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे अनेक सवाल सोमय्या यांनी केले. तसेच, परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून ही कंपनी चालवणारे लोक बनावट आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला. 

मालमत्ता जाहीर करावीसोमय्या पुढे म्हणाले की, 2013 मध्ये आर्मस्ट्राँगची मी पाहणी केली, तेव्हा भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं होतं. आज पुन्हा आम्ही पाहणी केली. आर्मस्ट्राँ इन्फ्रा, आर्मस्ट्राँ एनर्जीने मालेगावमधली गिरणा शुगर मिल विकत घेतली. गिरणा शुगर मिल ही भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता आहे. या कंपन्यांमध्ये जो पैसा आला तो कुठून आला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे, त्यांनी भुजबळाच्या इमारतीचे मालक कोण? हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी केलं.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळKirit Somaiyaकिरीट सोमय्या