शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
3
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
4
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
5
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
6
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
7
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
8
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
9
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
11
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
12
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
13
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
14
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
15
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
16
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
18
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
19
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

भंडारा-गोंदियाची जागा कुणाला? काँग्रेस की राष्ट्रवादी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 3:42 AM

नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; पोटनिवडणुकीने राजकीय चित्र बदलले

- अंकुश गुंडावारभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सहा महिन्यांपूर्वीच झाली. त्यानंतर आता पुन्हा दोन महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पोटनिवडणुकीतीलच उमेदवार रिंगणात राहणार की नवीन चेहरे पाहायला मिळणार, याकडे दोन्ही जिल्ह्यांतील मतदारांचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणुकीत मिळालेले यश कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा दम लागणार आहे. तर भाजपा पुढे पुन्हा यश खेचून आणण्याचे आव्हान आहे.या मतदारसंघाचा इतिहास पाहता एक खासदार लागोपाठ दुसºयांदा निवडून येत नाही. ही पंरपरा मागील २० वर्षांपासून आहे. यंदाही ही परंपरा कायम राहील का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या लोकसभा मतदार क्षेत्रात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २०१४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नाना पटोले लढले व ते विजयी झाले होते.त्यानंतर चार वर्षांनी पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिल्याने सहा महिन्यापूर्वी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपाचे उमेदवार मधुकर कुकडे ४२ हजार मतांनी विजयी झाले, तर भाजपचे जिल्ह्याध्यक्ष हेमंत पटले यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मतदार संघाचे समीकरण पुन्हा बदलले आहे. पुन्हा २ महिन्याने लोकसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. यासाठी अद्यापही कोणत्याही पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची अधीकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांच्या नावांबाबत दोन्ही जिल्ह्यातील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल व विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून माजी खा. नाना पटोले, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. सेवक वाघाये यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपकडून आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, माजी आमदार हेंमत पटले, माजी खासदार खुशाल बोपचे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, अ‍ॅड. रवी वाढई यांची तर बसपाकडून संजय नासरे, राजेश नंदूरकर यांची नावे चर्चेत आहे.राजकीय स्थिती२०१४ मध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या हातून ही जागा खेचून घेतली होती. मात्र २०१८ च्या पोटनिवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादी व पीरिपा आघाडीने पुन्हा भाजपाकडून ही जागा खेचून आपले वर्चस्व स्थापन केले.विधानसभेतील राजकीय चित्रभंडारा-भाजपतुमसर-भाजपसाकोली-भाजपगोंदिया - काँग्रेसतिरोडा-गोरेगाव- भाजपअर्जुनी मोरगाव-भाजप२०१४ मध्ये मिळालेली मतेनाना पटोले (भाजप)- 6,06,129 (५०.६२%)प्रफुल्ल पटेल (काँग्रेस-रॉका)- 4,56,875 (३८.१६%)२०१८ मध्ये मिळालेली मतेमधुकर कुकडे (काँग्रेस-रॉका-पिरिपा)- 4,42,213 (४६.६१%)हेमंत पटले (भाजपा)- 3,94,116 (४१.५४%)हे मुद्दे प्रभावशाली : लगतच्या छत्तीसगड राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच त्यांनी कर्जमाफी केली. प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात काही मोठे उद्योग सुरू झाले, मात्र गेल्या साडेचार वर्षांत साधी वीटभट्टीही सुरू झाली नाही. त्यामुळे बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकास हेच मुद्दे प्रभावी ठरतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा