शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

...अन् भाई जगताप यांचा पारा चढला! आंदोलनावेळी थेट पोलिसालाच धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 07:57 IST

गोरेगाव येथे काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्याला भाई जगताप यांनी हरकत घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी मुंबई काँग्रेसने शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. यावेळी गोरेगाव येथील आंदोलनादरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा पोलिसांशी वाद झाला आणि त्यांनी उपस्थित काॅन्स्टेबलला धक्का मारल्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला.

गोरेगाव येथे काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्याला भाई जगताप यांनी हरकत घेतली. आंदोलन बंद करा, असे सांगत असाल, तर आम्ही ऐकणार नाही. आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू राहील, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. दरम्यान, एक काॅन्स्टेबल पुढे सरकत असताना जगताप यांनी त्याला मागे सारले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. 

जगताप यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हाnव्हायरल झालेल्या व्हिडिओत काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनात भाई जगताप हेही सहभागी झाले. आंदोलनावेळी काही पोलीस घटनास्थळी येतात. आंदोलकांना सूचना देत असताना, जगताप हे पोलिसांना आरे-तुरेची भाषा वापरताना दिसतात. nयावेळी पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झालेली पाहावयास मिळत आहे. तसेच एका पोलिसाला ते ढकलतानाही दिसून आले. या आंदोलनात अनेकजण विनामास्क होते. अशात कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आंदोलन केल्याप्रकरणी जगताप यांच्यासह ५० कार्यकर्त्यांविरुद्ध १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आंदाेलकांना मागे सरकरण्याचे आवाहन!nगोरेगाव येथील एस. व्ही. रोड परिसरात शनिवारी हे आंदोलन पार पडले. याचाच व्हायरल झालेल्या व्हिडिओत काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनात भाई जगताप हेही सहभागी झाल्याचे दिसते. nपोलीस घटनास्थळी येतात. पोलीस आणि जगताप यांच्यात बाचाबाची झालेली पहायला मिळते. एका पोलिसाला ते ढकलताना दिसतात.nआंदोलक पोलिसांच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात येताच जगताप यांनी त्यांनाही मागे सरकण्याचे आवाहन केल्याचेही व्हिडीओत पहायला महायला मिळते.

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापFuel Hikeइंधन दरवाढcongressकाँग्रेसPoliceपोलिस