शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

निवडणुकीत ग्लॅमरचा तडका, बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा भाजपामध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 9:12 AM

Srabanti Chatterjee joins Bharatiya Janata Party : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चटर्जींनी भाजपाप्रवेश केला.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात कलाकारांची एन्ट्री होताना दिसून येत आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. यातच आता बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी (Bengali actor Srabanti Chatterjee) यांनी राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.  (Bengali actor Srabanti Chatterjee joins Bharatiya Janata Party ahead of West Bengal Assembly Election in Kolkata )

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चटर्जींनी भाजपाप्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता भाजपाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की त्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, यंदाही पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात कलाकारांची एन्ट्री होताना दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे. 

अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांच्याविषयी...33 वर्षीय श्राबंती चटर्जी या बंगालमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मायार बंधनमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर चॅम्पियन, भालोबासा भालोबासा, वाँटेड, फायटर, इडियट यासारख्या अनेक बंगाली चित्रपटात त्या झळकल्या आहेत. डान्स बांगला डान्स या रिअॅलिटी शोचं परीक्षणही त्यांनी केले आहे. 2003 मध्ये राजीव विस्वास यांच्यासोबत श्राबंती चटर्जी यांनी लग्न केले होते.

तृणमूल काँग्रेसने सुरु केला होता ट्रेंडनिवडणुकांमध्ये कलाकारांना तिकीट देण्याचा ट्रेंड पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पार्टीने केला होता. आतापर्यंत तृणमूल काँग्रेसमधून अनेक कलाकार राजकीय रिंगणात उतरले आहेत. भाजपाकडूनही आता कलाकारांना राजकाराणात येण्याची संधी दिली जात आहे. भाजपामध्ये पश्चिम बंगालमधील दहाहून अधिक कलाकारांनी आतापर्यंत प्रवेश केला आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा