शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Assam assembly election 2021: ठरलं! आसाममध्ये भाजपा ९२ जागांवर निवडणूक लढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 07:56 IST

Assam assembly election 2021: आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि सहयोगी पक्ष आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्स (यूपीपीएल) यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत झाले आहे.

ठळक मुद्देआसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. राज्यात २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

नवी दिल्ली : आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवड समितीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत भाजपाआसाममध्ये एकण ९२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय झाला. तसेच, पश्चिम बंगाल निवडणुकी संदर्भातही चर्चा झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरु आहे. (BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For Asom Gana Parishad, 8 For Others)

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि सहयोगी पक्ष आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्स (यूपीपीएल) यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत झाले आहे. यानुसार, एजीपी विधानसभेच्या २६ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. तर यूपीपीओ ८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, उर्वरित ९२ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात आयोजित केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, बीएल संतोष, राजनाथ सिंह, कैलाश विजयवर्गीय, थावरचंद गहलोत, शाहनवाज हुसेन, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.

विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होणारआसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. राज्यात २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ मार्च आहे.

कैलाश विजयवर्गीय यांचे ट्विटभाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी आपल्या ट्विटर हँडलवर बैठकीचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवड समितीची दिल्लीत आज बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.'

टॅग्स :BJPभाजपाAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Assamआसाम