शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 21:10 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर भाजपातील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत.

योगेश पांडे,नागपूर Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झाला नसताना विविध शक्यतांच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमधील तसेच इच्छुकांमधील अस्वस्थता वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेला (शिंदे) जाण्याच्या चर्चेने वेग पकडल्यामुळे तेथील भाजपचे पदाधिकारी व शंभराहून अधिक कार्यकर्ते नागपुरातील पक्षाच्या विभागीय कार्यालयात धडकले. जर ती जागा शिंदे गटाला गेली, तर तेथे बंडखोरी अटळ असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे भाजपसमोरील पेच वाढला आहे.

वरोऱ्याची जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेच्या वाट्याला गेली आणि शिंदेसेनेकडून काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे थोरले बंधू भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चेने गुरुवारी राजकीय वातावरण ढवळून निघाले.

भाजपाचे इच्छुक अस्वस्थ

भाजपच्या इच्छुकांना यामुळे धक्का बसला. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार रमेश राजुरकर, ओमप्रकाश मांडवकर यांनी तडकाफडकी कार्यकर्त्यांना घेऊन नागपूर गाठले. त्यांनी भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांची भेट घेतली.

वरोऱ्याची जागा शिंदेसेनेकडे जात असल्याच्या चर्चांबाबत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. वरोरा येथे भाजपचेच वर्चस्व आहे. जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर आम्ही आमच्या नेत्यांना बंडखोरी करण्यासाठी बाध्य करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४warora-acवरोराMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा