Arnab Goswami: “आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा”

By प्रविण मरगळे | Published: November 4, 2020 10:56 AM2020-11-04T10:56:52+5:302020-11-04T13:18:13+5:30

Arnab Goswami, BJP Devendra Fadanvis, Chandrakant Patil News: आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो अशा शब्दात आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Arnab Goswami Arrested, BJP Leader Devendra Fadanvis & Chandrakant patil Reaction | Arnab Goswami: “आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा”

Arnab Goswami: “आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा”

googlenewsNext
ठळक मुद्देआणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शनसरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातकविरोध करा, उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा.

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर भाजपानं ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत कार्यकर्त्यांना राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आवाज उठवा, मोर्चा काढा, राज्य सरकारचा विरोध करा अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्यात भाजपाविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारचा आंदोलन करून विरोध करा, उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात, पण महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही. आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

तर आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र कायद्याचं राज्य – शिवसेना

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य आहे, सबळ पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात, ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कोणावरही सुडबुद्धीने कारवाई केली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे

...हाच का तुमचा लोकशाही कारभार? – आशिष शेलार

एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या... वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

Web Title: Arnab Goswami Arrested, BJP Leader Devendra Fadanvis & Chandrakant patil Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.