शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Arnab Goswami: भाजपा आमदार राम कदम राज्यपालांना भेटले; पोलिसांविरोधात केली मोठी मागणी

By प्रविण मरगळे | Updated: November 5, 2020 11:45 IST

Arnab Goswami Arrested, BJP Ram Kadam, Governor Bhagat Singh Koshyari News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे.

ठळक मुद्देज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करापोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही अशी मागणी राम कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले.

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनीअर्णब गोस्वामींना अटक केली, त्यानंतर दुपारी अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. याबाबत आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राम कदम यांनी सांगितले की, ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करावी, पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही अशी मागणी राम कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.

दरम्यान याच प्रकरणात आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या ९ पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या ९ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकशाहीत पत्रकारिता चौथा स्तंभ आहे, पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी. गणवेशाचा वापर करून अर्णब गोस्वामींना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावं लागेल असं राम कदम यांनी सांगितले.  

अर्णब गोस्वामींना कोर्टात हजर केल्यावर काय घडलं?

अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. तेव्हा न्यायधीशांनी अर्णबची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अर्णब गोस्वामी न्यायलयात हातवारे, इशारे करताना दिसल्यावर न्यायधीश संतापले, त्यांनी अर्णब गोस्वामी यांना तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका असं बजावलं, त्यानंतर अर्णब शांत बसून सुनावणी ऐकू लागले. अर्णबला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी नाकारला. त्यानंतर रिमांड अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने ३ निरीक्षणे नोंदवली.

पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली, कोणताही सबळ पुरावा नसताना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे असा सवाल न्यायालयाने केला, तर अन्वय नाईक,आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध याबद्दल रायगड पोलीस न्यायालयाला समजून सांगू शकले नाहीत, पुरावेही देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचं सांगत न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. याबाबत बीबीसीनं वृत्त दिलं आहे. जवळपास ८-९ तास कोर्टात ही सुनावणी सुरु होती. न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकPoliceपोलिसBJPभाजपाRam Kadamराम कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख