शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
3
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
4
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
5
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
6
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
7
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
8
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

भाजपावर नाराज? नितीशकुमार सरकार लवकरच कोसळणार; राजदचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 10:17 PM

Bihar Politics: केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या आईचे निधन झाल्याचे भाजपानेही ट्विटरवर पोस्ट केले होते. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोकही व्यक्त केला.

रांची : बिहारचे माजी आरोग्य मंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. आज ते लालूप्रसाद यांना भेटण्यासाठी रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये आल होते. यानंतर त्यांनी नितीशकुमार यांचे सरकार लवकरच कोसळणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

राजदचे आमदार तेजप्रताप यांनी सांगितले की, भाजपा एक असा पक्ष आहे जो आपल्या मित्रपक्षांना गिळून टाकतो. अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता तिथे एकच आमदार जदयूमध्ये राहिला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना भाजपाच्या उमेदवारांना हरविले होते. 

 शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नितीशकुमार सरकार अडचणीत आली आहे. कृषी कायद्यांवरून नितीशकुमार सरकार लवकरच पडणार आहे., असे ते म्हणाले. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपाने पक्ष फोडल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी शब्दांत नसून कृतीमधून आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांना सांत्वन देण्यासाठी नितीशकुमार गेलेले नाहीत. आमदार फोडल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

प्रसाद यांच्या आईचे निधन झाल्याचे भाजपानेही ट्विटरवर पोस्ट केले होते. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोकही व्यक्त केला. प्रधान यांना फोनही केला. पाटन्यामध्ये असूनही काही अंतरावर प्रधान यांचे घर असूनही ते न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नितीशकुमार नेहमी अशावेळी जवळच्या व्य़क्तींना भेटण्यास जातात. त्यांच्या या वागण्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहारRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश