शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah: अमित शहा येतायत, दारे खिडक्या बंद ठेवा; गुजरात पोलिसांचे सोसायट्यांना अजब आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 14:07 IST

Amit Shah Ahmedabad Visit: अमित शहा पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करण्यासाठी सकाळी ११ वाजता गेले होते. आजचा दिवस ते मतदारसंघात असणार आहेत.

Amit Shah Ahmedabad Visit: अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याआधी (Amit Shah in Ahmedabad) वेजलपूर भागातील काही सोसायट्यांच्या लोकांना त्यांच्या घरांचे दरवाजे, खिडक्या बंद करण्याचे आदेश दिले होते. अमित शहा पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करण्यासाठी सकाळी ११ वाजता गेले होते. (Amit shah visit to Ahmadabad. )

अशाप्रकारचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या मेसेजनुसार पोलिसांनी सोसायटींच्या अध्यक्षांना पत्र पाठविली आहेत. यामध्ये कम्युनिटी हॉलमध्ये अमित शहा येणार आहेत. या रस्त्यावर आणि बाजुने असलेल्या इमारतींमधील घरांचे दरवाजे आणि खिड्या बंद ठेवण्यात याव्यात. जर बंद ठेवल्या नाही तर कारवाई केली जाईल, अशी ताकीद या पत्रात दिली आहे. 

पोलिसांनी वेजलपूरच्या स्वामीनारायण आणि स्वाती अपार्टमेंटसह अन्य सोसायट्यांच्या अध्यक्षांना पत्र लिहिले होते. अमित शहा यांना झे़ड प्लस सिक्युरिटी आहे, व्हीआयपी गेस्ट इथे येत असल्याने घरांचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्यात याव्यात. असे न केल्यास कारवाई करणार की नाही याबाबत या पत्रात लिहिण्यात आले नसल्याचे पडताळणीत समोर आले आहे. मात्र, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत लोकांना बंदिस्त राहण्याची ताकीद देण्यात आली होती. 

पोलिस अधिकारी एलटी ओडेदरा यांनी यावर खुलासा केला आहे. सोसायटीच्या लोकांना खिडक्या, दारे बंद ठेवण्याची विनंती केली आहे. अशा प्रकारे व्हीआयपी लोकांची ये-जा होते तेव्हा आम्ही लोकांना अशाप्रकारची विनंती करतो. त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असते. असे न केल्यास व्हीआयपींच्या मुव्हमेंटमध्ये सुरक्षेसंबंधी बाधा येऊ शकते.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाGujaratगुजरातPoliceपोलिस