शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 17:15 IST

amit shah in sindhudurg : अमित शहा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केलीय.

"बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेनं सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गानं चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती", असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी केलं आहे. ते सिंधुदुर्गात नारायण राणे (narayan rane) यांच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनावेळी बोलत होते. (amit shah attacks shiv sena in sindhudurg visit)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम मेडिकल कॉलेजचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि विशेषत: शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. 

"शिवसेनेनं सत्तेच्या लालसेपोटी जनमताचा अनादर करुन साथ सोडली. राज्यातील सध्याचं सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असून याची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं जात आहेत", असा खोचक टोला अमित शहा यांनी लगावला. 

"बंद खोलीत नव्हे, मी खुलेआम वचन देतो"महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शहा म्हणाले. 

मोदींच्या नावावर मतं मागितलीशिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

नारायण राणेंवर भाजपमध्ये अन्याय होणार नाहीअमित शहा यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. "नारायण राणे हे अन्यायाविरोधात पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. ते अन्याय होत असेल तर भविष्याचा कोणताही विचार न करता अन्यायाचा प्रतिकार करतात. म्हणूनच त्यांची वाटचाल ही वळणावळणाची राहीली आहे. त्यांचा सन्मान आणि आदर कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ग्वाही मी देतो", असं अमित शहा म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग