शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसोबत युतीच्या चर्चांवर राऊत म्हणाले, "भारत-पाक नाही, आमिर आणि किरण राव यांच्यासारखं आहे नातं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:59 IST

Sanjay Raut On BJP ShivSena : शिवसेना-भाजपची राऊत यांनी केली आमिर खान, किरण राव यांच्या नात्याशी तुलना. यापूर्वी फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या युतीच्या चर्चा.

ठळक मुद्देशिवसेना-भाजपची राऊत यांनी केली आमिर खान, किरण राव यांच्या नात्याशी तुलना. यापूर्वी फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या युतीच्या चर्चा.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी भाजपसोबत शिवसेनेच्या असलेल्या नात्याची तुलना अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या नात्याशी केली आहे. नुकतंच त्या दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप हे काही शत्रू नाहीत असं वक्तव्य केलं होतं. 

"आम्ही भारत पाकिस्तान नाही. आमिर खान आणि किरण राव यांना पाहा, हे अशाप्रकारचं नातं आहे. आमचे (शिवसेना-भाजप) राजकीय मार्ग निरनिराळे आहेत, परंतु आमची मैत्री कायम राहिल," असं संजय राऊत म्हणाले.यापूर्वी काय म्हणाले होते फडणवीस?"शिवसेना आणि भाजप यांच्यात शत्रुत्व नाही. मात्र आमच्यात वैचारिक मतभेद नक्कीच आहेत. शिवसेनेनं निवडणूक आमच्यासोबत लढवली. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेनं आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली, त्यांच्याच हात धरला. शिवसेना आणि आमच्यामध्ये वैयक्तिक स्वरुपाचा वाद नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत," असं फडणवीस यांनी म्हणाले होते.

शिवसेनेनं पुन्हा हात दिला, तर त्यांना सोबत घेणार का, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात जर-तर असं काही नसतं, असं फडणवीस म्हणाले. राजकारणात जे जर-तर वर राहतात, ते केवळ स्वप्नच पाहतात, राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं होतं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण