शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मोदी सरकारने राबविलेली सर्व धोरणे अपयशी- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 00:09 IST

आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेतही सरकारच्या हस्तक्षेपाची टीका

पनवेल : नोटाबंदी, जीएसटी सारखी मोदींनी राबविलेली धोरणे अपयशी ठरली आहेत. सर्वसामान्यांसह लघु-उद्योजकांचे यामध्ये कंबरडे मोडले आहे. आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेतही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने देश अराजकतेकडे चालला असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघरमध्ये केली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.देशात कधी नव्हे ते सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद आयोजित करून मोदी सरकारच्या न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पाढा वाचला, तसेच रिझर्व्ह कामकाजातही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने रिझर्व्ह बँकेचे गव्हरर्नर ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे या वेळी नमूद केले. काँग्रेसच्या राजवटीत सरकारने शेतकऱ्यांचा ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. तुम्ही काय केले? याचे उत्तर द्या. जवाहरलाल नेहरू, गांधी कुटुंबीयांनी देशासाठी काय केले? हा प्रश्न मोदी विचारत आहेत. राजीव गांधींनी देशात तंत्रज्ञान, दळणवळण तसेच आधुनिकता आणली, हे विसरता येणार नसल्याचे ते म्हणाले. मोदी हे हिंदुत्वाचा प्रचार करतात. पंतप्रधान कुठल्या एका धर्माचा नसतो तर सर्व जाती धर्माचा असतो, याचा उल्लेख त्यांनी अखेरीस केला.आपल्या भाषणात सतत ट्रोल होणाºया पार्थ पवार यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील आमदार, खासदार मोठ्या प्रमाणात सेना-भाजपचे आहेत. मात्र, आजही या मतदारसंघातील प्रश्न सुटलेले नाहीत. अजित पवारांवर झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपाचे उत्तर या वेळी पार्थ यांनी दिले. विनाकारण खोटे आरोप करून बाळगंगा व कोंढाणे धरणाचे काम थांबविले आहे. ही कामे वेळेत पूर्ण झाली असती तर परिसराला सुमारे १०० एमएलडी पाणी दररोज मिळाले असते, असा दावा त्यांनी या वेळी केला. सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, डॉ. राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.गर्दी जमविण्यासाठी धावपळखारघरसारख्या शहरी भागात आयोजित सभेला शरद पवार यांचे आगमन झाले तरी गर्दी जमली नव्हती. पाठीमागच्या अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. ही बाब आयोजकांच्या लक्षात येताच गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागली.साडेबारा टक्केच्या ऐतिहासिक निर्णयाची आठवणमी मुख्यमंत्री असताना साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार दि. बा. पाटील यांचे योगदान याकरिता महत्त्वाचे होते. या निर्णयामुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळाले, असे म्हणत सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्केच्या घेतलेल्या निर्णयाची आठवण शरद पवार यांनी करून दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवार