विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, याबाबतचा निर्णय...
By बाळकृष्ण परब | Updated: February 12, 2021 14:10 IST2021-02-12T14:10:07+5:302021-02-12T14:10:53+5:30
Ajit Pawar News : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येऊ लागले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, याबाबतचा निर्णय...
पुणे - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येऊ लागले आहेत. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत मोठे विधान करत सूचक संकेत दिले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाबाबत आधीच निर्णय झाला आहे. ते पद काँग्रेस कडेच राहणार. त्याबाबत काही बदल करायचा असेल तर तीन नेते- शरद पवार- सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे घेतील.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मुंबई मध्ये काय झाले ते तुम्ही पाहिले. त्या तक्रार कर्त्या महिलेनेच तक्रार मागे घेतली आहे. तरीही आरोप सुरु. तिच्या मागे कोणी बोलविता धनी होता का हे ही तपासले पाहीजे. पुण्यातल्या प्रकरणातही तपास सुरुच आहे.
दरम्यान, सध्या वादाचा मुद्दा ठरलेल्या वीजबिलांच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, वीजबील संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी. त्यावर व्याज आहे. त्यात तोडगा काढायचा प्रयत्न करतोय.