शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा; राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 19:20 IST

राज्यात काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले.

ठळक मुद्देविधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत तीन वर्षानंतर हायकमांड निर्णय घेईल. लवकरच राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली काढणार विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली नाही

नवी दिल्ली- आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस(Congress) स्वबळावरच निवडणुका लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे नाना पटोले(Nana Patole) आज दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.

राज्यात काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यापुढील काळात राज्यात पक्षवाढीसाठी काय केलं पाहिजे यासाठी बैठकीत चर्चा झाली. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येईल त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचं नाना पटोले म्हणाले.

त्याचसोबत विधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत तीन वर्षानंतर हायकमांड निर्णय घेईल. पण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे  हे नाना पटोलेंनी स्पष्ट केले. त्याचसोबत विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली नाही असंही नाना पटोले यांनी सांगितले. लवकरच राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली काढणार असल्याचं प्रभारी एच के पाटील म्हणाले.

शिवसेनेचा राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा

सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही, असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल असं शिवसेनेनं म्हटलं होतं.

काँग्रेसला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही

सामनाच्या अग्रलेखासंदर्भात नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती, त्यावरुन नानांना दिल्लीत पत्रकारांना प्रश्न विचारला. त्यावर, उत्तर देताना, मी सामना वाचत नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही, असे नानांनी म्हटले. मात्र, त्याचबरोबर संजय राऊत यांना टोलाही लगावला. कोणी काय टीका करावी हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया द्यायची का हा आमचा अधिकार आहे. पण, वारंवार एखाद्या पक्षाकडून सोबत राहूनही बोललं जात असेल, तर त्याचा एकदा विचार आम्ही करू, असे पटोले यांनी म्हटलं होतं. तसेच काँग्रेसला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सुईपासून रॉकेटपर्यंत या देशाची उभारणी काँग्रेसने केली आहे. गांधी परिवारावर टीका करणाऱ्याने एक लक्षात ठेवावं. सूर्यावर थुंकल्यानंतर ते आपल्याच अंगावर पडतं, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस