शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

"पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू होणार’’

By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 11:17 AM

Praveen Darekar News : ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देराज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहेत्याचे पडसाद होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येतील या निवडणुकीतील पाचही जागांवर भाजपाचा विजय होईल. तसेच तेथूनचा राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना सुरुवात होईल

मुंबई - अनेक घडामोडींनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवड्यात एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात होत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाही होतील, असे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपानेतेप्रवीण दरेकर यांनी केले आहे.राज्यातील सत्तांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. त्याचे पडसाद होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येतील. या निवडणुकीतील पाचही जागांवर भाजपाचा विजय होईल. तसेच तेथूनचा राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना सुरुवात होईल.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर हे जालना येथे आले होते. तेथे प्रचारसभा आटोपल्यानंतर दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी राज्यातील सरकार हे जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.तसेच कोरोनाच्या संकटकाळात राज्याची अर्थव्यवस्था नीट हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही, असा टोला भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण