शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 06:15 IST

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह  : ‘त्या’ नेत्यांचा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल

 शीलेश शर्मा    लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अत्यंत ढिसाळ कामगिरीनंतर पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावर पुन्हा ठिणगी पडली आहे. काही दिवसापूर्वी पक्षनेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नेते यानिमित्ताने पुन्हा सक्रिय झाले आहेत. टीका करणाऱ्या २३ नेत्यांचा आवाज दाबण्यात आला होता. परंतु आता बिहार आणि देशाच्या इतर भागातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर या नेत्यांनी नव्याने आपला आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष खासदार कपिल सिब्बल आणि कार्ती चिदंबरम यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा इशारा कार्ती चिदंबरम यांनी दिला आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमवर शाब्दिक हल्ला चढवीत मत मांडण्यास कुठलेही व्यासपीठ नसल्याने नाईलाजास्तव आपल्याला जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. आज पक्षाला अनुभवी, राजकीय परिस्थितीची जाण असणाऱ्या आणि संघटन बळकट करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना पुढे आणण्याची गरज आहे. आता आत्मचिंतनाची वेळ निघून गेली आहे. पक्षाला सशक्त नेतृत्व आवश्यक आहे. पक्ष कमकुवत झाला असल्याचे निवडणूक निकालानंतर सिद्ध झाले आहे. हे स्वीकारावे लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी महाआघाडीच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला. अर्थात राजदचे खासदार मनोज झा यांनी परिस्थिती सांभाळत हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, काँग्रेसचे नाही, असा खुलासा केला. परंतु निकालानंतर काँग्रेसच्या त्रुटी उघड झाल्या असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस  तारिक अन्वर यांनीही  मान्य  केले  आहे. 

काँग्रेससाठी पराभव ही सामान्य घटना काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटनेसारखा झाला आहे. बिहार निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अद्याप कोणताही विचार झालेला नाही. कदाचित त्यांना असे वाटत असेल की, सगळं काही ठीक आहे आणि ही सामान्य घटना आहे, असेही सिब्बल म्हणाले.

जनतेपर्यंत पोहोचण्याची गरजपक्षाच्या सुधारणेसंदर्भातील उपायांबद्दल सिब्बल म्हणाले, सर्वप्रथम आपल्याला संवादाची प्रक्रिया सुरू करावी लागेल. आम्हाला युतीची गरज आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचीही गरज आहे. जनता आमच्याकडे येईल याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. आमच्याकडे आता पूर्वीसारखी ताकद नाही. ज्यांना राजकीय अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे; परंतु या सुधारणेसाठी पहिल्यांदा विचारमंथन आवश्यक आहे.

बंडखोरीचा राग    आळवणारे सक्रियएकूणच बंडखोरीचा राग आळवणारे काँग्रेस नेते पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांना बाजूला सारण्यासाठी पंचायत निवडणुकात त्यांच्या समर्थकांना नेतृत्वाच्या इशाऱ्यावरुन तिकीट नाकारण्यात येत आहे. फारुख अब्दुल्ला-मेहबुबा यांच्या आघाडीसोबत निवडणूक समझोता करू नये. कारण यामुळे जम्मूत काँग्रेसचे नुकसान होईल, असे आझाद यांचे मत होते. परंतु काँग्रेस नेतृत्वाने समझोता करण्याचा निर्णय घेऊन तुमच्या मताची पक्षाला गरज नसल्याचे संकेतच त्यांना दिले.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीkapil sibalकपिल सिब्बलBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक