शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Arun Govil in BJP: ‘रामायण’ सिरियलमध्ये प्रभू राम साकारणारे अभिनेता अरूण गोविल यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:59 IST

अभिनेता अरूण गोविल यांनी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे.

ठळक मुद्देसध्याच्या काळात जे आमचं कर्तव्य आहे ते करायला हवं. मला राजकारण याआधी समजत नव्हतेनरेंद्र मोदी हे जेव्हापासून देश सांभाळत आहेत, तेव्हा देशाच्या राजकारणात बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहेआता मी देशासाठी योगदान देऊ इच्छितो, त्यासाठी मला एका व्यासपीठाची गरज होती

नवी दिल्ली – अलीकडेच पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्तीने भाजपात प्रवेश केला होता, त्यापाठोपाठ आता १९९० च्या दशकातील प्रसिद्ध पौराणिक मालिका रामायण यामधील अभिनेता अरूण गोविल(Arun Govil) यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्री रामाची भूमिका अरूण गोविल यांनी केली होती.

अरूण गोविल यांनी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह उपस्थित होते. भाजपात सहभागी झाल्यानंतर अरूण गोविल म्हणाले की, सध्याच्या काळात जे आमचं कर्तव्य आहे ते करायला हवं. मला राजकारण याआधी समजत नव्हते, परंतु नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे जेव्हापासून देश सांभाळत आहेत, तेव्हा देशाच्या राजकारणात बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. माझ्या मनात जे येतं ते करून मी मोकळा होतो असं त्यांनी सांगितले.

तसेच आता मी देशासाठी योगदान देऊ इच्छितो, त्यासाठी मला एका व्यासपीठाची गरज होती, आणि भाजपापेक्षा चांगलं व्यासपीठ मला मिळालं नाही, पहिल्यांदा मी ममता बॅनर्जी यांना जय श्री राम घोषणा देण्यापासून एलर्जी असल्याचं पाहिलं, जय श्री राम ही फक्त घोषणा नाही असा टोला अरूण गोविल यांनी ममता बॅनर्जींना लगावला. ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अरूण गोविल यांचा भाजपा प्रवेश विशेष मानला जातो.

दरम्यान, भाजपामध्ये अरूण गोविल यांना कोणती जबाबदारी देणार हे अद्याप स्पष्ट नाही, भाजपा सदस्य बनल्यानंतर अरूण गोविल विधानसभा निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे. परंतु यावर पक्षाकडून अथवा अरूण गोविल यांच्याकडून कोणतीही अधिकृत भूमिका पुढे आली नाही. अरूण गोविल यांच्यापूर्वी रामायणातील अन्य कलाकारही राजकारणात आले होते, रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्यासह हनुमानाची भूमिका करणारे दारा सिंह, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी हेदेखील राजकारणात उतरले होते, दीपिका चिखलिया यांनी भाजपाच्या तिकिटावर दोनदा निवडणूकही लढली आहे.

टॅग्स :BJPभाजपाramayanरामायण