शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शरद पवारांच्या हृदयावरील जखम कार्यकर्त्यांनी भरून काढावी, जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 18:44 IST

Jitendra Awhad : गणेश नाईक यांच्याकडे मंत्रिपद असताना त्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यांची एकूण वाटचाल बघता ते वैराग्याकडे वाटचाल करतात असा टोला आव्हाड यांनी लगावला.

ठळक मुद्देनवी मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या बैठकीत जितेंद्र आव्हाड बोलत होते.

नवी मुंबई : मीरा भाईंदरचे नगरसेवक ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले त्याचवेळी मी, गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार असल्याचे ओळखले होते आणि शरद पवार यांना याबाबत कल्पना दिली होती, परंतु त्यांच्यावर पवारांचा प्रचंड विश्वास होता. काही काळातच नाईक यांनी राष्ट्रवादी सोडली. ही जखम पवार यांच्या हृदयावर आजही आहे. ही जखम भरून काढण्याचे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. रविवारी, दि. १७ जानेवारी रोजी नवी मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

विकास कशाला म्हणतात हे मला माहीत नाही, परंतु दुसऱ्याने केलेली कामे आपल्या नावावर कशी खपवायची हे जर शिकायचे असेल तर नाईकांकडे जाऊन शिका, असा टोला त्यांनी लगावला. प्रत्येक सभेला शरद पवार यांच्याशेजारी नाईक बसायचे, परंतु भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना खाली जागा मिळाली नाही. त्याचं वाईट वाटत असल्याचे सांगत त्यांच्यात स्वाभिमान उरलेला नसल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या चहू बाजू उघडून टाकल्या आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणावर आधारित एफएसआय देण्यात आलेला आहे. नवी मुंबईतील सुमारे तीन लाख लोकांना याचा फायदा होणार असून, पुनर्बांधणीसाठी चांगला एफएसआय मिळणार असून, यामुळे डेव्हलपमेंटच्या सर्व वाटा उघड्या झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून भूमिपुत्रांचे पुन्हा एकदा सीमांकन केले जाईल, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करून गावठाणाला मिळणारा चार एफएसआय देण्यात येईल, असे आश्वासन देत असल्याचे आव्हाड म्हणाले. 

गणेश नाईक यांच्याकडे मंत्रिपद असताना त्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यांची एकूण वाटचाल बघता ते वैराग्याकडे वाटचाल करतात असा टोला आव्हाड यांनी लगावला. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री विभागाचे अस्लम शेख यांनी भ्रष्टाचार आणि किडनॅप करून आलेला पक्ष म्हणजे भाजप असल्याची टीका करत प्रश्न नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा नसून पक्षासाठी मतदान करू नका, देशासाठी मतदान करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. गेल्या २५ वर्षांत यांना भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करता आला नाही त्यामुळे त्यांना दूर करण्याची वेळ आली असल्याचे सांगत महाविकास आघाडीचा महापौर बसविण्याचे आवाहन खासदार राजन विचारे यांनी केले. नवी मुंबईतील हुकूमशाही मोडीत खायची असून, धनशक्तीपुढे जनशक्ती जिंकते हा इतिहास भाजपला दाखविण्याची वेळ आली असल्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले. 

महाविकास आघाडीत कोणतेही वाद किंवा मतभेद नसल्याचे सांगत तथाकथित शिल्पकारांची नवी मुंबईसाठी शून्य योगदान असल्याचा टोला शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांनी लगावला. भ्रष्टाचाराची कीड कायमची घालविण्याची सुवर्णसंधी आली असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संतोष शेट्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, निरीक्षक प्रशांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ससून डॉक नवी मुंबईत आणानौसेनेची हद्द येत असल्याने मुंबईतील ससून डॉक बंद करावा, अशी त्यांनी सूचना केली आहे. मुंबईतील ससून डॉक नवी मुंबईत आणावा आणि यामध्ये येथील आगरी कोळी भूमिपुत्रांना प्रथम स्थान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली. ऐरोलीजवळ मोठी जागा आहे. खाडीची खोली चांगली असेल आणि त्याठिकाणी मोठ्या बोटी येऊ शकत असतील तर ससून डॉक ऐरोली येथे आणावा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री अस्लम शेख यांनी सदर मागणी रास्त असून, लवकरच याबाबतीत सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

महिला पदाधिकाऱ्यांची नाराजीमहाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेली बैठक चांगली झाली. निवडणुकीत आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणार आहोत. परंतु आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या प्रमुख महिला पदाधिकारी होत्या, त्यामधील किमान एका महिलेला तरी बोलण्याची संधी देणे गरजेचे होते. परंतु बोलू न दिल्याची खंत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्ता लीना लिमये म्हणाल्या. वरिष्ठांनी याची दाखल घ्यायला हवी असल्याचे त्यानी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडGanesh Naikगणेश नाईकNavi Mumbaiनवी मुंबईcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार