ठळक मुद्देराज्यात ग्राम पंचायत निवडणुकीत 'आप'ने उघडलं खातंदापक्याळ ग्रामपंचायतीत 'आप'चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आलेअरविंद केजरीवालांनी केलं विजय उमेदवारांचं अभिनंदन
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्राम पंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत 'आप'चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत.
आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी 'आप'च्या उमेदवारांच्या विजयाची माहिती ट्विट केली आहे. अजिंक्य शिंदे यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही याची दखल घेत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. केजरीवाल यांनी खास यासाठी मराठीतून ट्विट केलं आहे.
"विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा", असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.
लातूर जिल्ह्यात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. पण आम आदमी पक्षानं या जिल्ह्यात खातं उघडल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'आप'चे लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली दापक्याळ येथील ग्रामपंचायतीत 'आप'ने विजय प्राप्त केलाय.
Read in English
Web Title: aap wins Gram Panchayat election in Marathwada arvind Kejriwal is happy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.