शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 23:39 IST

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय वाटतं; वाचा जनतेचा कौल

मुंबई: दीड वर्षांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष अगदी टिपेला पोहोचला होता. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं बिनसलं. त्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडला आणि थेट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करत राज्यात सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण राज्यात अस्तित्वात आलेलं महाविकास आघाडी लवकरच पडणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा म्हटलं. मात्र दीड वर्षानंतरही महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे.ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. हे सरकार अंतर्गत कलहामुळे कोसळेल. मग आम्ही राज्यातल्या जनतेला पर्याय देऊ, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा वृत्तवाहिनीनं एक सर्वेक्षण केलं. महाविकास आघाडी सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असं मत नोंदवलं. तर ३० टक्के लोकांनी नाही असं मत व्यक्त केलं. तर २६ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा डागळली आहे का, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभाग नोंदवणाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर ४३ टक्के लोकांनी होय, २९ टक्के लोकांनी नाही, तर २८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र वाझेंविरोधातच राष्ट्रीय तपास यंत्रणेला पुरावे सापडले. त्यामुळे वाझेंना निलंबित करावं लागलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत वाझेंचं समर्थन केलं होतं. या प्रकरणामुळे गृह खात्यानं विश्वासार्हता गमावल्याचं मत ४८ टक्के जणांनी व्यक्त केलं. तर यामुळे गृह खात्यानं विश्वासार्हता गमावली नसल्याचं २५ टक्के जणांना वाटतं. तर २७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानी