शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

भाजपकडील २७, काँग्रेसच्या १२ जागांवर आज मतदार देणार कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:52 AM

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या, गुरुवारी ९५ मतदारसंघातील सुमारे १६ कोटी मतदार मतदान करणार असून, त्यात दक्षिण, उत्तर व ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या, गुरुवारी ९५ मतदारसंघातील सुमारे १६ कोटी मतदार मतदान करणार असून, त्यात दक्षिण, उत्तर व ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे. या ९५ पैकी ६२ जागा केवळ तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्रातील आहेत. देशभर कडक उन्हाळा असल्याने सकाळी व संध्याकाळी अधिक मतदान होण्याची शक्यता आहे.मतदारांच्या बोटावर जी शाई लावली जाते, त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत तब्बल ३३ कोटींचा खर्च आला आहे. उद्याच शाईच्या २६ लाख बाटल्या लागतील. एका बाटलीतील शाई सुमारे ३५0 मतदारांपुरती असते. यंदा शाईचा खर्च खूपच वाढला आहे. देशात २00९ साली शाईवर जो खर्च झाला, त्याच्या तिप्पट खर्च यंदा झाला आहे. त्यावर्षी सुमारे ११ कोटी रुपये शाईवर खर्च झाले होते.ज्या ९५ मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे, त्यापैकी ५८ जागा गेल्या म्हणजे २0१४ च्या निवडणुकांत प्रादेशिक पक्षांनीच जिंकल्या होत्या. या ९६ पैकी भाजपला २७ व काँग्रेसला १२ मिळाल्या होत्या. तामिळनाडूतील अण्णा द्रमुकनेच ३७ जागा जिंकल्या होत्या. शिवाय अण्णा द्रमुकच्या मित्रपक्षाने एक जागा जिंकली होती. पुडुच्चेरीमधील एक जागाही अण्णा द्रमुकनेच जिंकली होती. यंदा भाजपशी समझोता केलेल्या अण्णा द्रमुकला तितक्या जागा मिळवणे अवघड जाणार आहे. तिथे यंदा द्रमुक व काँग्रेस आघाडीचे मोठे आव्हान दिसत आहे. बिहारमध्येही गेल्या वेळी भाजपने चांगली बाजी मारली होती. यंदा त्या विजयाची पुनरावृत्ती करणे भाजपला शक्य होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कर्नाटकातही २0१४ साली चांगला विजय मिळवला होता. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकांतून तिथे काँग्रेस-जनता दल (से) यांचे सरकार आले. हे दोन्ही पक्ष तिथे यंदा एकत्रपणे लढत असून, त्याचा त्रास भाजपला होऊ शकेल. तामिळनाडू व कर्नाटकातील यंदाची निवडणूक गाजली ती प्राप्तिकर खात्याने विरोधी नेत्यांवर टाकलेल्या छाप्यांमुळे. तामिळनाडूमध्ये सव्वाशे कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. पण वा प्राप्तिकर खात्याने या रकमा कोणाकोणाच्या आहेत, हे स्पष्ट केलेले नाही. यंदा दारू, अंमली पदार्थ वसोने-चांदीही प्रचंड प्रमाणात सापडली. उत्तर प्रदेशातून भाजपच्या हेमामालिनी, काँग्रेसचे राज बब्बर या बॉलिवूड कलाकारांचे भवितव्यही उद्या ईव्हीएममध्ये बंद होईल. काश्मीरच्या श्रीनगरची जागा गेल्या वेळी पीडीपीने जिंकली होती. पण पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला विजयी झाले. ते व कर्नाटकातील तुमकुरूमधून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा पुन्हा यंदा रिंगणात आहेत.>दुसºया टप्प्यात कुठे होणार मतदान?तामिळनाडू (३८ जागा)अण्णाद्रमुक ३७: कांचीपुरम्, अर्कोणम, तिरूवेल्लूर, चेन्नई उत्तर, चेन्नई दक्षिण, चेन्नई मध्य, तिरुवन्नामलई, कृष्णगिरी, श्रीपेरम्बदूर, कोर्इंबतूर, निलगिरी, इरोड, तिरुपूर, नमक्कल, सेलम, अराणी, कलाक्कुरुची, तुत्तुक्कुडी, विरुधनगर, तेनकासी, रामनाथपूरम, तेनी, तंजावूर, शिवगंगा, मदुराई, तिरुनलवेली, पोलाच्ची, करूर, डिंडीगल, पेरंबलूर, कुड्डलोर, तिरुचिरापल्ली, चिदम्बरम, नागापट्टनम, मैलादूतुरै.पीएमके १ : धर्मपुरीभाजप १ : कन्याकुमारी :कर्नाटक (१४ जागा)कॉँग्रेस ७ : कोलार, तुमकूर, चित्रदुर्ग, चिकबाळापूर, बंगळूरू ग्रामीण, चामराजनगरजेडीएस २ : मंड्या, हसनभाजप ६ : उडपी-चिकमंगळूर, म्हैसूर, बंगळुरू दक्षिण, बंगळूरू मध्य, बंगळूरू उत्तर, दक्षिण कन्नडबिहार (५ जागा)जेडीयू १ : पूर्णियाराजद १ : बांका, भागलपूरराष्टÑवादी १ : कठीयारकॉँग्रेस १ : कृष्णगंजपश्चिम बंगाल (३ जागा)माकपा १ : रायगंजतृणमूल १ : जलपायगुडीभाजप १ : दार्जिलिंगओडिशा (५ जागा)भाजप १ : सुंदरगढबीजद ४ : बारगड, आस्का, कंधमल, बोलनगीरउत्तर प्र्रदेश (८ जागा)भाजप ८ : अलीगढ, नागिना, आमरोहा, आग्रा, फत्तेपूरसिक्री, हाथरस, मथुरा, बुलंदशहरआसाम (५ जागा)एआययूडीएफ १ : करीमगंजभाजप २ : नौगाव, मंगलडोईकॉँगेस २ : सिलचर, आॅटोनॉमस डिस्ट्रीक्टछत्तीसगड (३ जागा)भाजप ३ : कनकेर, महासमुंद, राजनंदगावजम्मू- काश्मीर ( २ जागा)पीडीपी १ : श्रीनगरभाजप १ : उधमपूरमणिपूर (१ जागा)कॉँग्रेस १ : इनर मणिपूरत्रिपुरा (१ जागा)माकपा १ : त्रिपुरा पूर्व (तहकूब)पुद्दुचेरी (१ जागा)एआयएनआरसी १ : पुद्दुचेरी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019