शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

खडसेंचा दणका, भाजपला खिंडार; ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 08:57 IST

Eknath Khadse 18 bjp corporators joins NCP: पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. खडसे समर्थक ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे

जळगाव: भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला खिंडार पाडलं आहे. भाजपमधील खडसे समर्थक नेते आणि कार्यकर्ते आता राष्ट्रवादीची वाट धरू लागले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला गळती लागली आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेल्या खडसेंची सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे. एका बाजूला चौकशीचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे खडसेंनी भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. (18 bjp corporators joins NCP in the presence of Eknath Khadse)भुसावळमधील तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. यामध्ये १८ विद्यमान आणि १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा; “माझा छळ करणं तुम्हाला महागात पडेल, जेवढं छळाल तेवढं...”मला जितकं छळाल, तितकं भाजपचं नुकसान होईल. माझा छळ भाजपला महागात पडेल, असा इशारा खडसेंनी नुकताच भाजपला दिला होता. ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी दिलेला इशारा अतिशय सूचक होता. यानंतर लगेचच भाजपमधील आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक आजी-माजी नगसेवकांचा समावेश आहे."ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण आता..."

काय म्हणाले एकनाथ खडसे?आज कार्यकर्ते भाजपा सोडतायेत, त्यांच्या मनात असुरक्षितता आहे, इतकं करूनही नाथाभाऊला न्याय मिळाला नाही, त्यांच्यामागे ईडी लावली जातेय, काय काय धंदे केले जातात, नाथाभाऊंना कसं तुरुंगात टाकता येईल असं बघितलं जातं आहे, पण मी कधीही आयुष्यात धंदे केले नाहीत, आयुष्यात कधीही २ नंबरच्या धंद्यात पडलो नाही, अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कोणीही सांगावं कोणाकडून नोकरीसाठी पैसे घेतलेत, कामासाठी पैसे घेतलेत, एकाने उभं राहावं आणि सांगावं नाथाभाऊ खोटं बोलतायेत असं आव्हान त्यांनी दिले.

...आता मी सीडी लावण्याचं काम करणारमी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटलांसह अनेकांनी मला सांगितलं तुमच्या मागे ईडी लागू शकते, त्यावर मी प्रवेश मेळाव्यात म्हटलं होतं, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. परंतु आता माझ्यामागे प्रत्यक्षात ईडीची चौकशी लावली आहे, त्यामुळे मी सीडी लावण्याचं काम करणार आहे असं म्हणत खडसेंनी भाजपाला गंभीर इशारा दिला.

माझा गुन्हा काय आहे?"मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही असं सांगताना एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) टीका केली. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय