शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

भाजप आमदारांच्या निलंबनाचा विषय राज्यपालांकडे; १२ आमदारांनी घेतली कोश्यारींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:49 IST

राज्यपालांकडून योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन; आशिष शेलार यांची माहिती

मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झालं. शेवटी, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. भाजपच्या निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत स्वत:ची बाजू त्यांच्यासमोर मांडली. या प्रकरणी यथोचित कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं आमदारांनी सांगितलं.

'विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आज घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती आम्ही राज्यपालांना दिली. त्यांच्याकडे आम्ही सत्यकथन केलं. घडलेल्या घटनेबद्दलचा अहवाल मागवून त्यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याची विनंती आमच्याकडून राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी आमची बाजू ऐकून घेतली. त्यांनी काही प्रतिप्रश्न केले. त्यानंतर त्यांनी योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली,' अशी माहिती निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'आम्ही सभागृहात अपशब्द वापरला नाहीच. आम्ही तालिका अध्यक्षांच्या दालनातही कोणताही अनुचित शब्द वापरला नाही. आमच्यावर करण्यात आलेली कारवाई एकतर्फी आहे. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नाही. निलंबित करण्यात आलेले अनेक सदस्य तर पीठासीन अधिकाऱ्यांजवळ गेलेच नव्हते, ते दालनातही उपस्थित नव्हते. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई केली गेली. लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे,' अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली.

विधानसभेतील आमचे आकडे तोकडे करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असेल, तर त्यात यश येणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. भाजपचं संख्याबळ कमी करून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मानस असल्यास तसं काहीही होऊ शकणार नाही. कारण ती निवडणूकच बेकायदेशीर असेल, असंही शेलार पुढे म्हणाले. '२०२२ मध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार षडयंत्र रचत आहे. जनतेमध्ये चुकीची माहिती पोहोचवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पीठासीन अधिकाऱ्यांजवळ, तालिका अध्यक्षांच्या दालनात ४-५ आमदार होते. मग १२ आमदारांचं निलंबन कसं काय केलं?' असा सवाल निलंबित आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलार