पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ लहान मुलांना दिली ZyCov-D लस, कोणालाही त्रास नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:09 PM2021-10-05T19:09:24+5:302021-10-05T20:02:48+5:30

पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सत्तेचाळीस मुलांवर ही चाचणी पार पडली

zydus cadila zycovd vaccine trial on children pune successful no fever fatigue pain | पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ लहान मुलांना दिली ZyCov-D लस, कोणालाही त्रास नाही

पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ लहान मुलांना दिली ZyCov-D लस, कोणालाही त्रास नाही

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांना लस देण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्याज्या मुलांना ही लस देण्यात आली त्यांना कोरोना झालेला नसावा अशी अट होती

पिंपरी: लहान मुलांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. देशभरात लहानग्यांवर कोरोना लसीची चाचणी पार पडत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच लहान मुलांच्या लसीकरणाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे. झायकोव्ह-डी (ZyCov d) नावाची ही लस असून अहमदाबादच्या झायडस कॅडीला (zydus cadila) कंपनीने याची निर्मिती केली आहे.

पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सत्तेचाळीस मुलांवर ही चाचणी पार पडली. यापैकी एकाही मुलाला कोणताही त्रास झालेला नाही, असा दावा हॉस्पिटलने केला आहे. डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉ. शलाका आगरखेडकर यांनी सांगितले की, १२ ते १८ या वयोगटातील मुलांना ही लस देण्यात आली आहे. या लसीचे २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस द्यावे लागतात. मार्चपासून ही लस देणे सुरू केले होते. तर २६ ऑगस्टपर्यंत या ४७ मुलांचे तीनही डोस पूर्ण झाले आहेत.

'मुलांना कोणताही त्रास नाही'-

कोणतीही लस घेतली की मुलांना जो त्रास होतो, तसा कोणताही त्रास ही लस दिल्यावर झालेला नाही. मुलांना लस देण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. तसेच पालकांची संमती देखील घेण्यात आली होती. ज्या मुलांना ही लस देण्यात आली त्यांना कोरोना झालेला नसावा अशी अट होती. सर्व अटी आणि नियमांचे पालन करून लस देण्यात आली आहे, अशी माहितीही आगरखेडकर यांनी दिली.

Web Title: zydus cadila zycovd vaccine trial on children pune successful no fever fatigue pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.