दुचाकीवरील युवक कंटेनरखाली सापडून ठार; सोमाटणे फाटा येथे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 16:19 IST2017-11-18T16:17:58+5:302017-11-18T16:19:53+5:30
सोमाटणे फाटा येथे दुचाकीवरील युवक खाली पडल्याने कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला.

दुचाकीवरील युवक कंटेनरखाली सापडून ठार; सोमाटणे फाटा येथे अपघात
शिरगाव : सोमाटणे फाटा येथे दुचाकीवरील युवक खाली पडल्याने कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला.
अनिल तिवारी (वय अंदाजे ३०, मूळ उत्तर प्रदेश) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. सोमाटणे परिसरात नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेलसाठी शेगडी व इतर साहित्य घेऊन हॉटेलकडे निघाले असता सोमाटणे फाटा येथील चौकात विरुद्ध दिशेने निघाले असता दुचाकीवर शेगडी घेऊन मागे बसलेला अनिल तिवारी गाडी आदळल्याने खाली पडले. त्याच वेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर (आरजे ०९, जीबी ३७२१) खाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.