देहूरोडला लोकलच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:21 IST2018-07-19T14:20:06+5:302018-07-19T14:21:59+5:30

रेल्वे रूळ ओलांडत असताना ३५ वर्षीय युवकाला लोणावळा-पुणे लोकलची त्याला धडक बसली.यात तो गंभीर जखमी झाला होता.

youth death in railway local accident at dehuroad | देहूरोडला लोकलच्या धडकेत तरुण ठार

देहूरोडला लोकलच्या धडकेत तरुण ठार

पिंपरी : लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ( दि. १८ जुलै) रात्री नऊच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ घडली.रेल्वे पोलीस पुरुषोत्तम कर्दळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा रेल्वे स्थानकावरून रात्री साडे आठ वाजता निघालेली लोणावळा-पुणे लोकल नऊच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ आली. त्यावेळी अज्ञात युवक रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याला धावत्या लोकलची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या युवकाचे वय अंदाजे ३५ आहे.

Web Title: youth death in railway local accident at dehuroad