मोशीत विषारी औषध प्राशन करुन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 16:01 IST2019-02-20T15:58:08+5:302019-02-20T16:01:44+5:30
उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली.

मोशीत विषारी औषध प्राशन करुन तरुणाची आत्महत्या
पिंपरी : उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. विनोद ज्ञानेश्वर पाटील (वय 21, रा. तुपे वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी-भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी विनोद याने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.