विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:57 IST2018-06-25T14:55:04+5:302018-06-25T14:57:52+5:30
वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
पिंपरी : विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना सोमवारी( दि.२५ जून ) सकाळी वाकड येथे उघडकीस आली. अविनाश संभाजी पवार (वय ३५ रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यू झालेल्या व्यक्तीकडे काही कागदपत्रे आढळून आली. कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली आहे. कौटुंबिक कारणातून आपण आत्महत्या करीत असल्याचे अविनाश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.