शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडे मदतीसाठी आलेल्या तरुणीलाच मागितले दहा हजार, नैराश्यात जाऊन तिने संपवलं स्वतःचे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 12:40 IST

लग्न करण्यासाठी तरुण मागत होता भरमसाठ पैसे

ठळक मुद्देतरुणाने राजकीय कार्यकर्ता असलेल्या दाजीकडूनही पोलिसांवर दबाव आणला

पिंपरी: रहाटणी येथील रहिवासी तरुणी श्रद्धा कोकणे हीने पोलिसांकडे मदतीची याचना केली. पण पोलिसही तिच्या मदतीला धावून आले नाहीत. शेवटी त्रास असह्य झाल्याने तिने आत्महत्या केली. तरुण आणि त्याचं कुटुंबिय श्रद्धाला ब्लॅकमेल करत होतं. याची तक्रार तिने वाकड पोलिसांकडे केली. पण पोलिसांकडूनच तिला दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यानं तिचा केवळ तक्रार अर्जच दाखल करण्यात आला. त्यामुळे नैराश्यात  श्रद्धाने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिचा भाऊ ऋतिक कोकणे याने केला आहे. २६ एप्रिलला रहाटणी इथे ही घटना घडली. 

श्रद्धा कोकणे (वय २४) हिचं लग्न नात्यातीलच अजिंक्य साठे या मुलाशी ठरलं होतं. मात्र नंतर साठे कुटुंबियांकडून भरमसाठ पैशांची मागणी आणि त्यातच अजिंक्य याचे इतर मुलींशी संबंध या त्रासाला कंटाळून श्रध्दाने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. पण साठे कुटुंबियांकडून वारंवार लग्नासाठी दबाव टाकला जात होता. लग्न न केल्यास माझ्यासोबतचे तुझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी अजिंक्य श्रध्दाला देत होता. त्यामुळे श्रद्धा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वाकड पोलीस स्टेशनला गेली होती. पण तिथेही तिची निराशा झाली. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तिथल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने पोलिसांनी केवळ अर्जच दाखल करून घेतला. 

त्यानंतर पोलिसांनी 'मी व माझे कुटुंबीय श्रद्धाला त्रास देणार नाही, तिचे फोटो व व्हिडीओ डिलीट केले आहेत,' असा मजकूर टाइप केलेल्या कागदावर अजिंक्यची सही घेतली. या औपचारिकतेनंतरही अजिंक्यकडून श्रद्धाला सोशल मीडियावर त्रास देणे सुरूच राहिले. हा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर श्रध्दाने २६ एप्रिलला राहत्या घरी आत्महत्या केली. 

अजिंक्यचे राजकीय कार्यकर्ता असलेल्या दाजीकडूनही पोलिसांवर दबाव आणला गेला होता, असा आरोप श्रद्धाच्या भावाने केला आहे. श्रद्धाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूला अजिंक्य, त्याचे आईवडील, दोन बहिणी आणि दाजी जबाबदार असल्याचा मॅसेज तिने आपल्या मोबाईलवर टाइप करून ठेवला होता. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पैकी दोन बहिणी आणि दाजी यांना जमीन मिळाला आहे. तर अजिंक्यच्या आई वडिलांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. तसेच वाकड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सपना देवताळे यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस