शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:55 IST

- सहकाऱ्याच्या मदतीने डोक्यात गजाने मारहाण; दोघांना अटक

पिंपरी/भोसरी : प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात झालेल्या वादानंतर जीम ट्रेनर तरुणीने सहकाऱ्याच्या मदतीने लोखंडी गजाने मारहाण करून वडमुखवाडीतील तरुणाचा खून केला. आळंदी नगर परिषद हद्दीतील काळे काॅलनीत ‘प्रोटीन पझल’ नावाच्या दुकानात बुधवारी (दि. १३ ऑगस्ट) दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर मारहाण करणाऱ्या दोघांनीही पळून न जाता थेट दिघी पोलिसांत जाऊन खुनाची कबुली दिली. गोपीनाथ ऊर्फ लल्ला वरपे (वय ३५, रा. वडमुखवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रांजल दिलीप तावरे (२२, रा. पठारे मळा, चऱ्होली) आणि यश पाटोळे (२६, रा. डुडुळगाव, आळंदी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल तावरे आणि यश पाटोळे हे दोघे चोविसावाडी फाट्यावर असलेल्या एका जीममध्ये ट्रेनर आहेत. शिवाय आळंदी येथील काळे काॅलनीत देहू फाटा येथे त्यांचे ‘प्रोटीन पझल’ नावाचे सप्लीमेंट विक्रीचे दुकान आहे.मृत गोपीनाथ वरपे याच्याशी जीममध्ये प्रांजलची ओळख झाली होती. मात्र, काही कारणातून त्यांच्यात वाद झाला होता. बुधवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास प्रांजलने गोपीनाथला चऱ्होली फाट्यावर बोलण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. तेथून दुचाकीवर बसून ते आळंदी हद्दीतील धाकट्या पादुका मंदिरासमोर गेले. तेथे जाताच प्रांजल आणि नंतर आलेल्या यशने गोपीनाथला लोखंडी गजाने डोक्यात जबर मारहाण केली. त्याला तेथेच सोडले व दुकानाचे शटर बंद करून निघून गेले. गंभीर जखमी झालेल्या गोपीनाथला काहींनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.दरम्यान, गोपीनाथला मारहाण केल्यानंतर यश पाटोळे आणि प्रांजल तावरे हे दोघेही पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दिघी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरा दिघी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मृत गोपीनाथ अविवाहित

मृत गोपीनाथ ऊर्फ लल्ला वरपे वडमुखवाडी (चऱ्होली) येथील असून, तो अविवाहित होता. तो कोठेही कामाला जात नसला तरी, वडिलोपार्जित संपत्तीमुळे श्रीमंत व्यक्ती म्हणून परिचित होता. अनेकांना त्याने आर्थिक मदतही केली होती.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी