Young man beaten with girl after being evicted from Karate practice site at Pimple Saidagar | पिंपळे साैदागर येथे कराटे प्रॅक्टिसच्या ठिकाणाहून हुसकावल्याने मुलीसह तरुणाला मारहाण 

पिंपळे साैदागर येथे कराटे प्रॅक्टिसच्या ठिकाणाहून हुसकावल्याने मुलीसह तरुणाला मारहाण 

पिंपरी : कराटे प्रॅक्टिस सुरू असलेल्या ठिकाणाहून हकलल्याने राग येऊन शिवीगाळ केली. तसेच कापून टाकीन, अशी धमकी देऊन १७ वर्षीय मुलीला दगडाने मारून एकाला मारहाण केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पिंपळे साैदागर येथील लिनियर गार्डन येथे मंगळवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. 

शिवराम केशव फुलारे (वय २१, रा. रहाटणी चाैक) व अभिषेक अनिल चव्हाण (वय २०, रा. रहाटणी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह संतोष फुलारे (रा. पिंपळे साैदागर) व पाच ते सहा अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली नागेश डोणे (वय ३१, रा. शिवार गार्डन हाॅटेलच्या पाठीमागे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे कराटे क्लासमधील मित्र लिनियर गार्डनमध्ये प्रॅक्टिस करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले असता त्यांना हकलून दिले. त्याचा आरोपींना राग आला. त्यांनी त्यांच्या पाच ते सहा मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांचे प्रशिक्षक जहीर अन्सारी यांना शिवीगाळ केली. गेटच्या बाहेर आले की, कापून टाकीन, अशी धमकीही दिली. तसेच १७ वर्षीय मुलीला दगड मारून जखमी केले. त्याचप्रमाणे सागर जोशी याला हाताने मारहाण केली, असे फिर्यादी नमूद केले आहे.

Web Title: Young man beaten with girl after being evicted from Karate practice site at Pimple Saidagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.