Young man beaten due to former issue | तळेगाव येथे पूर्ववैमनस्यातून तरूणाला मारहाण
तळेगाव येथे पूर्ववैमनस्यातून तरूणाला मारहाण

पिंपरी : जुनी भांडणे मिटविण्याचे कारण सांगत बेकायदा जमाव जमवून वाद घातला. तसेच वाहनाचे नुकसान करत तरुणाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ११) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथे घडली. 
 याप्रकरणी देवीदास अनंता गायकवाड (वय २४, रा. कांब्रो, नाणे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रमोद सांडभोर, मयुर भोकरे, सुधीर परदेशी, ओंकार पडवळ, मयुर पवार (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये जुने वाद होते. आरोपीने ही भांडणे मिटविण्यासाठी फिर्यादी देवीदास यांना बोलावून घेतले. तिथे बेकायदा जमाव जमवुन वाद करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दगड मारल्याने फिर्यादी यांच्या भावास जखमी केले. त्यांच्या वाहनाची काच फोडून नुकसान केले. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत

Web Title: Young man beaten due to former issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.