वाढदिवसाला आलेल्या तरुणाचा अपहरण करुन खून : आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:11 IST2018-07-20T14:02:29+5:302018-07-20T14:11:03+5:30
वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ही घटना सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडली.
_201707279.jpg)
वाढदिवसाला आलेल्या तरुणाचा अपहरण करुन खून : आरोपी फरार
पिंपरी : वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. ही घटना सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडली.
आदित्य खोत (वय २५, रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आदित्य याला काही जणांनी वाढदिवसाचा केक कापण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. पिंपरीतील सुभाषनगर येथे सर्वजण जमले होते. त्यांनी आदित्यला नांदेगाव येथे नेले आणि त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. बुधवारपासून आदित्य बेपत्ता होता. याबतबत त्याच्या आईने गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यात आदित्य बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांनी त्याला फोन केला असता मित्रांसोबत असल्याचे त्याने आईला सांगितले होते.