शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेला; आताच्या बॉयफ्रेंडने कारने उडवले; पिंपरीतील खळबळजनक घटना

By प्रकाश गायकर | Updated: May 28, 2024 16:46 IST

जुना बॉयफ्रेंड तरुणीशी बोलत थांबलेला असताना नवीन बॉयफ्रेंडने कारने उडवले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली

पिंपरी : जुन्या प्रेयसीला (एक्स गर्लफ्रेंड) भेटायला गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. २८) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास यशवंतनगर, पिंपरी येथे घडली. एक्स गर्लफ्रेंडच्या आताच्या प्रियकराने तरुणाच्या अंगावर कार घातली तसेच त्याला बेदम मारहाण केली.

निलेश दिलीप शिंदे (वय ३०, रा. गवळीमाथा, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुशील भास्कर काळे (४१, रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शरद जगन्नाथ टिळक (२५, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, निलेश शिंदे यांचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे मागील काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. दरम्यान निलेश यांनी एक्स गर्लफ्रेंडला भेटण्याची इच्छा व्यक्त करत तिला यशवंतनगर येथे बोलावून घेतले. दरम्यान तिने हा प्रकार आपल्या प्रियकराला म्हणजेच सुशील याला सांगितला.निलेश हे मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवर बसून एक्स गर्लफ्रेंडसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून सुशील हा कार घेऊन आला. आपल्या प्रेयसीला बोलत थांबलेल्या निलेश यांच्या दुचाकीला सुशील याने कारने धडक दिली. या धडकेत निलेश दुचाकी वरून खाली पडले. त्यानंतर त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी सुशील याने निलेश यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. सुशील काळे याने कारमधून उतरून निलेश यांच्या तोंडावर, छातीवर लाथा मारल्या. यामध्ये निलेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सुशील याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाcarकारAccidentअपघात