शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

नाकारलेल्या संस्थेलाच काम; दुटप्पी ठरावामुळे भाजपात दुफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:36 AM

स्थायी समितीची चौकशीची मागणी गुलदस्तात

पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम नाकारून त्यांच्या कामाची चौकशी करावी, असा आदेश काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीने दिला होता. मात्र, तो बासनात गुंडाळून पुन्हा एकदा याच संस्थेला महिलांना प्रशिक्षणाचे काम देण्याचा घाट घातला आहे. यावरून सत्ताधारी भाजपात दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत महिलांसाठी ज्ञानकौशल्य वाढ विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. मात्र, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही एकमेव संस्था महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम काही वर्षांपासून करीत आहे. त्याचा लाभ होत नसल्याच्या तक्रारींमुळे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी या संस्थेच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली होती.तसेच तत्कालीन महिला-बालकल्याण समिती व स्थायी समितीनेही या संस्थेच्या कामाबद्दल शंका व्यक्त केली होती. एप्रिल २०१८ मध्ये या संस्थेला काम देण्याचे नाकारण्यात आले. संस्थेने केलेल्या महिला सबलीकरणाच्या कामाची सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला होता. तसेच या संस्थेऐवजी महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने दुसºया मार्गाने चालना देण्याचा निर्णय घेतला होता.स्थायी समितीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला होता. मात्र, तरीदेखील प्रशासनाने चौकशी केली नाही. अहवाल सादर केला नाही. त्यामुळे या ठेकेदार संस्थेला अभय देण्याची प्रशासनाची भूमिका असावी, अशी शंका उपस्थित होत आहे.पाच महिन्यांपूर्वी महापालिकेच्या तत्कालीन महिला-बाल कल्याण समिती आणि स्थायी समितीचा निर्णय बासनात गुंडाळण्यात आला. याच संस्थेला पुन्हा महिला प्रशिक्षणाचे काम देण्याचा ठराव मागील आठवड्यात महिला व बाल कल्याण समितीने घेतला. त्यानंतरपुन्हा मंगळवारी झालेल्या बैठकीत या संस्थेला काम देण्यासाठी दुरुस्तीचे वेगवेगळे तीन ठराव करण्यात आले.त्यात सभावृत्तान्त कायम होण्याची प्रतीक्षा न करता अंमलबजावणी करण्याचेही समितीने सूचित केले आहे. कामाबद्दल नाराजी व्यक्त केलेल्या संस्थेलाच काम देण्याचा घाट घातला जात आहे. संस्थेने प्रशिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये घेतले, परंतु त्याचा महिलांना फायदा झालेला नाही, असा सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांचा आक्षेप आहे. आता या निर्णयावरून यू टर्न घेतला जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड