मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:23 IST2018-12-09T16:21:32+5:302018-12-09T16:23:50+5:30
लग्नात मान पान दिला नाही म्हणुन पती व सासरकडील मंडळींनी मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद
पिंपरी : लग्नात मान पान दिला नाही म्हणुन पती व सासरकडील मंडळींनी मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा सचिन राजगुरू (वय २३,रा. इंद्रायणीनगर) या विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सचिन तुकाराम राजगुरू (पती), सुमन तुकाराम राजगुरू (सासू), तुकाराम वेताळ राजगुरू (सासरे), शितल वाघमारे (मावस सासू), सोन्या तुकाराम राजगुरू (दीर), पुजा प्रतिम कांबळे (नणंद), कांचन सतिश चौबे (भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत.