शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक होणार? दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 15:32 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी यात्रेला भेट देण्यासाठी पाटील येणार

पिंपरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी (दि. १७) पिंपरी-चिंचवड शहरात दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा शाईफेक होणार? असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल केला. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भाजपाचे माजी नगरसेवक हर्षल मच्छिंद्र ढोरे (वय ४६, रा. जुनी सांगवी) याप्रकरणी शनिवारी (दि. १७) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेल, चिंचवड अध्यक्ष विकास लोले आणि दशरथ बाबूराव पाटील (रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेतील कार्यक्रमासाठी मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सांगवी येथे दौरा जाहीर करण्यात आला. यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे शाईफेक झाली होती. त्या घटनेचा आधार घेऊन समाजामध्ये असंतोष व तेढ निर्माण करण्यासाठी आरोपींनी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियात व्हायरल केला.आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पो. सांगवी, पत्रकार मित्रांनो आजपण चांगला अँगल घ्या, मु. पो. सांगवी (पवनाथडी यात्रा), चंपाचे तोंड काळे केले रे, असा मजकूर विकास लोले याने फेसबुकवर प्रसारित करून चिथावणी दिली. तसेच दशरथ पाटील याने तो मजकूर व्हाॅटस्ॲप स्टेटसवर ठेवून चिथावणी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी यात्रेत मंत्री चंद्रकांत पाटील येणार म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबतच काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणPoliceपोलिसBJPभाजपा