शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मुहूर्तावर धावणार का?

By admin | Updated: August 31, 2015 04:01 IST

अनेक वर्षांपासून प्रलंबित बीआरटी बससेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. औंध-रावेत या मार्गावर पाच सप्टेंबरपासून बस धावणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्या

पिंपरी : अनेक वर्षांपासून प्रलंबित बीआरटी बससेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. औंध-रावेत या मार्गावर पाच सप्टेंबरपासून बस धावणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत महापौर शकुंतला धराडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मार्गाची पाहणी करणार आहेत, त्यानंतर याबाबतची घोषणा होणार आहे.केंद्र सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेच्या वतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने बीआरटी राबविण्याची घोषणा २००८ मध्ये झाली. त्यानंतर २००९ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. दापोडी ते निगडी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता, वाकड ते कासारवाडी, तळवडे ते चऱ्होली फाटा, औंध ते रावेत, टेल्को रोड, नाशिक फाटा ते मोशी, भक्तिशक्ती ते किवळे ते तळवडे, हिंजवडी ते केएसबी चौक, बोपखेल ते आळंदी या शहरातील दहा मार्गांचे नियोजन करण्यात आले. दहापैकी एकाही मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. एकाही मार्गावरून बीआरटी बस धावण्यास सुरुवात झालेली नाही. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी हा मार्ग तयार आहे. बसस्टॉप गंजू लागले आहेत. आजवर साडेतीनशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. या मार्गाबाबत न्यायालयाने फटकारल्याने औंध-रावेत हा मार्ग सुरू करण्याची घोषणा आयुक्त राजीव जाधव यांनी केली होती. त्यासही सहा महिने पूर्ण होत आले आहेत. १ मे, जून, जुलै, १ आॅगस्ट, १५ आॅगस्ट असे मुहूर्त निश्चित करण्यात आले. मात्र, काम पूर्ण न झाल्याने हे मुहूर्त पुढे ढकलण्यात आले आहेत. १ आॅगस्टपासून बसची चाचणी सुरू झाली. मात्र, मार्ग आणि त्यावर असणाऱ्या सेवा सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी ही बससेवा सुरू केलेली नाही. महापौर शकुंतला धराडे यांनी या प्रश्नी पीएमपी, बीआरटी राबविणारे अधिकारी, महापालिका प्रशासनास धारेवर धरल्यानंतर ५ सप्टेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा महापालिकेने केलेली नाही. महापौर धराडे या सोमवारी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या सेवेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे निश्चित केल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. (संबंधित वृत्त ७)