तिसरी मुलगीच झाल्याच्या कारणावरुन पत्नीचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 20:59 IST2019-03-25T20:56:41+5:302019-03-25T20:59:42+5:30

तिसरीही मुलगी झाल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Wife's harassment due to the birth of third daughter | तिसरी मुलगीच झाल्याच्या कारणावरुन पत्नीचा छळ

तिसरी मुलगीच झाल्याच्या कारणावरुन पत्नीचा छळ

पिंपरी : तिसरीही मुलगी झाल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामनयन भारती (रा. बोलाईमळा कॉलनी क्र.२, भारती निवास जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे.

 

याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रापंचिक कारणावरुन तसेच एकापाठोपाठ तिसरीही मुलगी झाल्याच्या कारणावरुन आरोपी पतीने पत्नीला शिवीगाळ व हाताने मारहाण केली. डोके भिंतीवर आपटून जिवे मारण्याची धमकी दिली. वारंवार होत असलेल्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Wife's harassment due to the birth of third daughter