‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण? चर्चेत येण्यासाठी आटापीटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:50 AM2018-11-10T01:50:50+5:302018-11-10T01:51:55+5:30

अल्पावधीत चर्चेत येण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून सध्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात असून, त्यावर खुन्नस देणारा व आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळतो.

 Who will be facing the poster boy? Atapeta to come to the discussion | ‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण? चर्चेत येण्यासाठी आटापीटा

‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण? चर्चेत येण्यासाठी आटापीटा

Next

पिंपरी : अल्पावधीत चर्चेत येण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून सध्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात असून, त्यावर खुन्नस देणारा व आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळतो. यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी एकप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचाच प्रयत्न केला जात आहे़ पिंपरी-चिंचवड शहरातील अशा प्रकारच्या ‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण, असा पश्न उपस्थित होत आहे.
वाहन परवाना नसतानाही ट्रीपल सीट वाहन चालवायचे, टोळक्याच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या आवारात रॅश ड्रायव्हिंग करायची यासह आता वाढदिवसाचे निमित्त साधून पोस्टर उभारण्यावरही अल्पवयीन मुलांचा अधिक कला आहे. या पोस्टरवर ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो तसेच खुन्नस देणारा मजकूर असतो. सराईत गुंडांचे फोटोही पोस्टरवर झळकत असतात. दरम्यान, अशा पोस्टरबाजीतून अनेकदा टोळक्या टोळक्यांमध्ये वादाच्या घटनाही घडतात.
खुन्नस देणारी गाणी, डायलॉग
एका टोळक्याचे दुसऱ्या टोळक्याशी वाद असल्यास एकमेकांना खुन्नस देण्याचे प्रकार घडतात. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साउंड लावलेले असल्यास त्यावर खुन्नस देणारी गाणी वाजविली जातात. आता तर खुन्नस देणारे अनेक ‘डायलॉग’ही आले आहेत. अशा ‘डायलॉग’चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
वाढदिवस भव्य स्वरुपात साजरा केला जातो. वेगवेगळ्या नावाने परिचित असलेल्या टोळक्यातील मुलांनी वाढदिवसाला उपस्थित राहावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात. यातून एकप्रकारे ताकत दाखविण्यासाठीची धडपड सुरु असते.

पोलिसांचे दुर्लक्ष : नावापुढे अजब विशेषणे
अल्पवयीन मुलांचे फोटो पोस्टरवर झळकत असताना, त्यांच्या नावासमोर अजब प्रकारची विशेषणे जोडलेली पाहायला मिळतात. डॉन, भाई, बादशहा, शेर अशा प्रकारच्या विशेषणांचा समावेश असतो. वाढदिवसानिमित्त टोळके जमा करून त्यांच्या माध्यमातून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जातो. केक कापताना तलवारीचा वापर करणे, मध्यरात्रीच्या वेळी केक कापून गोंधळ घालणे, वाढदिवस असणाºया मुलाला सोबत घेऊन परिसरातून घोषणा देत फेरी काढणे, असे उद्योग केले जात आहेत.

सोशल मीडियावरही उड्या
खुन्नस देणारा, आक्षेपार्ह असलेला मजकूर फोटोसह तयार करून सोशल मीडियावर टाकला जातो. यास मोठ्या प्रमाणात लाईक, कमेंटसही मिळतात.
पोस्टरवरील ‘बॉईज’ अल्पवयीन असल्याने त्यांच्या ओठांवर मिशाही फुटलेल्या नसतात. मात्र, पोस्टरवरील मजकुरातूनच दहशतीची भाषा केली जाते. सराईत गुंडांच्या नावांचा, टोपण नावांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या पोस्टरची जोरदार चर्चाही होते.

Web Title:  Who will be facing the poster boy? Atapeta to come to the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.