Aamir Khan : बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ पोलीस आयुक्तालयात येतो तेव्हा...; अभिनेता आमिर खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 20:08 IST2023-03-11T20:07:12+5:302023-03-11T20:08:44+5:30

Aamir Khan : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आमिर खान याने सदिच्छा भेट दिली.

When Bollywood's 'Perfectionist' comes to Police Commissionerate...; Actor Aamir Khan met the Commissioner of Police! | Aamir Khan : बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ पोलीस आयुक्तालयात येतो तेव्हा...; अभिनेता आमिर खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

Aamir Khan : बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ पोलीस आयुक्तालयात येतो तेव्हा...; अभिनेता आमिर खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

पिंपरी : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याने अनेक चित्रपटांमधून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अभिनयातून पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलीसही त्याचे चाहते आहेत. असेच चाहते असलेल्या पोलिसांसमोर अचानक आमिर आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आमिर खान याने सदिच्छा भेट दिली. कोट्यवधी भारतीयांच्या मनावर अधिराज्य कराणारा अभिनेता अचानक आपल्यासमोर आल्याचे पाहून पोलिसांना काही सूचेनासे झाले. त्यांनी लागलीच आमिरसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. काही जणांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही. आमिरनेही आढेवेढे न घेता ‘पोज’ दिली. 

पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठेकीनंतर गुन्हे शाखेचे अधिकारी बाहेर पडत असताना त्यांनी आमिरला पाहिले. हस्तांदोलन करीत आमिरसोबत त्यांनी संवाद साधला. हाय, हॅला म्हणत आमिरनेही त्यांना प्रतिसाद दिला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनाही आमिरचे अप्रूप वाटले.     

पोलीस आयुक्तांशी चर्चा
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे मुंबई येथे होते. त्यावेळी आमिर खान आणि आयुक्त यांची ओळख झाली. त्या ओळखीतून आमिर याने मित्र म्हणून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेत चर्चा केली, असे सांगण्यात आले.

Web Title: When Bollywood's 'Perfectionist' comes to Police Commissionerate...; Actor Aamir Khan met the Commissioner of Police!